भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त यावल येथे आयोजित जनजातीय गौरव सेवा समारंभाच्या निमंत्रणावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. काही ठराविक पत्रकारांनाच निमंत्रण, तर इतरांना डावलल्याचा आरोप होत असून पत्रकार वर्तुळातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव सेवा समारंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण प्रक्रियेवरून पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कार्यक्रमासाठी काही ठराविक पत्रकारांनाच निमंत्रित करण्यात आले, तर इतर पत्रकारांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

ग्रामीण भागातील प्रश्न, आदिवासी समाजाच्या समस्या आणि शासकीय योजनांना प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांमध्ये असा दुजाभाव का? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन सर्व पत्रकारांना समान सन्मान आणि वागणूक द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शासकीय कार्यक्रमांमध्ये पत्रकारांची निवड नेमक्या कोणत्या निकषांवर केली जाते? सर्व पत्रकारांना समान न्याय कधी मिळणार? असे प्रश्न सध्या पत्रकार वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *