प्रतिनिधी आयुब शेख
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तत्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

पोलीस अधीक्षक निवा जैन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सई भोरे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद उस्मानाबाद, जिल्हा ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे सर्व गावातील पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले.सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात या यंत्रणेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. गेल्या नऊ वर्षात पुणे,नाशिक,सातारा,अहमदनगर जिल्हयातील सहा लाख हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत.

संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.ग्राम सुरक्षा यंत्रणा वापरण्याबाबत नागरिकांना आवाहन करून ग्रामीण भागातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील हा संदेश पोचून नळदुर्ग हद्दीतील 99 गाव सुरक्षा यंत्रणा खाली आणण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दिले या वेळेस उपस्थित होते उप विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सई भोरे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत सहाय्यक निरीक्षक सुधीर मोटे पोलीस निरीक्षक तायडे उपनिरीक्षक अहमद शहा सर्व गावातील नागरिक पोलीस पाटील सरपंच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते