उस्मानाबाद : मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्या,यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्याहेतू पुणे ते मुंबई भव्य पदयात्रा काढत आहोत असे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलिप गायकवाड यांनी एन टी व्ही शी बोलताना सांगितले, व आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उमरगा तहसीलदार मार्फत देण्यात आले.

लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्या वतीने उमरगा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र अ, ब, क,ड वर्गीकरण करुन मातंग समाजाच्या लोकसंख्याच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावे. यासह राज्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात व अनेक प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आद्यकांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांनी सन १८२२ साली गंजपेठ पुणे येथे देशातील पहिली क्रांती शाळा स्थापन करुन भायतीय शशस्त्र क्रांतीचा लढा उभारला अद्य क्रांती पिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमितील माती कपाळी भाळुन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लहुश्री मातंग हदय सम्राट विष्णुभाऊ कसबे साहेब व प्रदेश कोअर कमिटी अध्यक्ष कैलासदादा खंदारे पुणे ते मुंबई पायी पदयात्रा करत आहेत. या पदयात्रेचा समारोप दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी आझाद मैदान येथे मोर्चा मध्ये रुपांतर होणार आहे. तरी शासन व प्रशासनाला अशी विनंती आहे की, चालु असलेली पदयात्र्या कुठल्याही जिल्हामध्ये अथवा तालुकामध्ये अडवण्याचा प्रयत्न करु नये. अडवण्याचा प्रयत्न केलास लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जश्यास तसे उत्तर देण्यास येईल. असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे . सदर निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलिप गायकवाड, उमरगा तालुका अध्यक्ष सुधाकर बनसोडे, तालुका उपाध्यक्ष दत्ता जोगदंड, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष तुळशीराम देडे, तालुका सदस्य लक्ष्मण गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *