सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद
उस्मानाबाद : कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि .१९ रोजी जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या पुतळ्यास कर्नाटक भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत दुग्धाभिषेक घालण्यात आला.

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना .जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्याचे आदेश दिले होते . त्या अनुषंगाने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी कर्नाटक भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा जाहीर निषेध करत घोषणा दिल्या .
यावेळी उमरगा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संजय पवार, माजी अध्यक्ष जाफरसेठ कारचे, दिलीप जाधव ,विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, उमरगा तालुका युवक अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, युवक विधानसभा कार्याध्यक्ष पवार शहराध्यक्ष सुशील दळगडे, विद्यार्थी अध्यक्ष समर्थ सुरवसे ,ग्रंथालय निरीक्षक जगदीश सुरवसे, सरपंच रणजीत गायकवाड,बाळासाहेब माशाळ , प्रताप राठोड, अप्पू हिप्परगे, योगेश जाधव, नंदु भोसले, पाटील, हाजीसाब सय्यद, फय्याज पठाण, वाघंबर सरवदे, कपिल चव्हाण, अनिल व्हंताळकर, प्रदीपकुमार कांबळे ,गुलाब कांबळे, दिगंबर भालेराव ,चंद्रकांत गायकवाड , सुरज भोसले , नितीन बिराजदार , अनेकत तेलंग , विक्रम कुमावत ,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते