सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद

उस्मानाबाद : पीक विमा संदर्भात उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील शेतकऱ्यांनी उमरगा तहसीलदार यांना निवेदन देत त्वरित पिक विमा जमा करन्यात यावा अन्यथा संबंधित विमा कंपनीवर फसवणूकिचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.तर या निवेदनात आंदोलनाचा इशाराही देण्यात आलं आहे.

निवेदनात म्हटले आहे की,बजाज अलांईंसकडील विमा काम रद्द करावे.हे काम शासनानेच करावे. 72तासात ऑननलान तक्रार दाखल करण्याची अट रद्द करण्यात यावी.यासाठी महिन्याची मुदत देण्यात यावी.व ऑफलाईनही तक्रार स्वीकारावी.जितकी विमा टक्केवारी मंजूर झाली तितकी रक्कम देण्यात यावी.विमा संदर्भातील सर्व जाचक नियम अटी रद्द करण्यात यावे .आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.विमा न मिळालेल्या शेतकर्यांची यादीही देण्यात आली.विमा न मिळाल्यास उपोषणासह तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे कलदेव निंबाळच्या उपक्रमशील सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाउपाध्यक्षा सुनिता पावशेरे यांच्यासह अनेक महिला शेतकर्यांनी यावेळी दिले. शेतकर्यांवरील अन्याय, व्यथा महिला शेतकरी यांनी यावेळी मांडल्या तहसीलदार यांनी यावर योग्य ती कारवाई लवकरच करण्याचे आश्वासन दिले.

निवेदनावर मंगल माने, सुमन भांडेकर, छबुबाई बिराजदार प्रभावती गायकवाड, रुक्मीण घोटमाळे ,मंगल माने, सुमन भांडेकर, छबुबाई , प्रभावती गायकवाड, रुक्मीण घोटमाळे आदी महिला शेतकरी यांच्या सह गहिनीनाथ बिराजदार,दिगंबर डोणगावे, शरणाप्पा घोटमाळे, बाबूराव पांचाळ,माधव बिराजदार,किसन डिगुळे, केरनाथ गायकवाड, शिवाजी रसाळ, गोरख भंडे, गुरुनाथ कांबळे, बसलिंग बोकडे, ज्ञानेश्वर बिराजदार, मधुकर सुर्यवंशी, अविनाश भंडे,बाबूराव पांचाळ, गुरलिंग कारभारी, भिमराव बलसुरे,शशिकांत चिंचोले, रमेश तळेकर, भरत साळुके, मधूकर गुगळगावे, बिराजदार ,मारुती गायकवाड, कल्लेश्वर , अमर सुर्यवंशी,जालिंदर ढोणे, विनायक गायकवाड , भागवत लड्डा, दिगंबर बोकडे, आनंद पाटील, तुकाराम घंटे, याच्यासह एकशे आठ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदर निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *