जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात दहिगाव येथील आदर्श विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे वर्किंग मॉडेल सादर करत विद्यालयाने सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटातून बाजी मारली.

यावल तालुक्यातील अकलूद येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये १२ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय ५४ वे विज्ञान प्रदर्शन पार पडले. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, सहगटविकास अधिकारी कदम, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, गटशिक्षण अधिकारी फिरोज पठाण, गटविस्तार अधिकारी सरोज पाटील, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक व माजी मुख्याध्यापक तसेच यावल तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र महाले उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील ८८ शाळांनी सहभाग नोंदवला. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक आणि नववी ते बारावी उच्च माध्यमिक अशा दोन गटांत विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल सादर केले.

यामध्ये आदर्श विद्यालय, दहिगाव, तालुका यावल या विद्यालयाने उच्च प्राथमिक गटातून आपत्ती व्यवस्थापनाचे वर्किंग मॉडेल सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. या मॉडेलसाठी विद्यालयाच्या शिक्षिका निशा पाटील, सविता महाजन आणि प्रयोगशाळा सहाय्यक निलेश सुरेश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल आदर्श विद्यालयाचे चेअरमन सुरेश देवराम पाटील, मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, पर्यवेक्षक श्री. डी. आर. महाजन, विज्ञान शिक्षक तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले. आमदार अमोल भाऊ जावळे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय प्रणालीचा वापर कसा करावा आणि पर्यावरणाचे संतुलन कसे राखावे, याविषयी मार्गदर्शन केले.

समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच समाजातील इतर ज्ञानही दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

अशा प्रकारे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *