प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा पूर्वच्या वतीने १७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेची बांधणी मजबूत करणे, दिव्यांग बांधवांचे प्रश्न आणि आगामी आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गाढे, प्रदेश सचिव सुरेश मोकल, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे आणि उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख सुरेखाताई ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जळगाव येथील पदमालय विश्रामगृहात बैठक होणार आहे. बैठकीला प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ आणि राज्य अभियान प्रमुख महेश बढे सर उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत तारांकित प्रश्न, तक्रारी, सार्वजनिक प्रश्न, महत्त्वाच्या घटना, निधीसाठी प्रस्ताव, प्रलंबित कामे, नवीन नियुक्त्या, दिव्यांग संपर्क अभियान आणि ३ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई आंदोलनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव-भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यांतील जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष हरिभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *