नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून माळी समाजाचे मुखपत्र ‘मासिक माळीभूषण’ यांच्या संकल्पनेतून समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘सन्मान नवदुर्गांचा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दहिगाव येथील रेखा प्रमुख चौधरी यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानित करण्यात आले.

नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीच्या आराधनेचा, सन्मानाचा आणि गौरवाचा मंगलमय उत्सव! याच पवित्र पर्वाचे औचित्य साधून ‘मासिक माळीभूषण’च्या वतीने ‘सन्मान नवदुर्गांचा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत दहिगाव येथील रेखा प्रमुख चौधरी यांचा संपादक भीमराव माळी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला.

एकत्रित कुटुंबपद्धतीचा अनमोल वारसा जपत शेती व्यवसायाच्या माध्यमातून काळ्या आईची सेवा करणे, कुटुंबातील नातेसंबंध दृढ ठेवणे, तसेच प्रेम, आपुलकी आणि संस्कारांची शिदोरी देणे, अशा आध्यात्मिक आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वासाठी रेखा चौधरी यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

त्यांना हा सन्मान मिळाल्यामुळे दहिगाव आणि परिसरातून त्यांचे स्वागत व कौतुक होत आहे. रेखा चौधरी या दहिगावचे माजी उपसरपंच आणि भाजपाचे कट्टर कार्यकर्ते प्रमोद धनसिंग चौधरी यांच्या धर्मपत्नी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *