शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबल चोरणाऱ्या आणि सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पारनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सातारवाडी येथील सासरवाडीत लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
सुपा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305(5), 112 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 246/2026 दाखल आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अमोल विजय गावंडे, वय 19 वर्षे, रा. जामगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
पारनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना आरोपी सातारवाडी, ता. पारनेर येथील सासरवाडीत लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि दिवटे यांनी पथकासह पोहेकॉ अमोल धामणे, कल्याण लगड आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे यांच्या मदतीने सातारवाडी येथे सापळा रचून आरोपी अमोल विजय गावंडे याला ताब्यात घेतले.
कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सुपा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष वमने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सफौ पोहेकॉ अमोल धामणे, पोहेकॉ कल्याण लगड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल सारंग वाघ, होमगार्ड भोंडवे, चितळकर, तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंड आणि अरुण सांगळे यांनी सहभाग घेतला.
