जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच २० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे आणि गावात बसवण्यात आलेल्या १२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पणही करण्यात आले.

किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायत इमारतीसाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पुढाकाराने २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, सरपंच रूपाली कोळी, उपसरपंच रियाज तडवी, तसेच ग्रामपंचायत सदस्य साजिद शहा, राहुल साळुंखे, वैशाली संजय पाटील, कल्पना रतन वानखेडे आणि ताहेर तडवी उपस्थित होते.

आमदारांच्या निधीतून २० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गावातील विविध चौक, मोक्याची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या १२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बाळू पाटील, शांताराम कोळी, रामराव पाटील, संजय महाजन, जगदीश कोळी, संजय कोळी, निळकंठ पाटील, सुरेश तायडे, रवींद्र सपकाळे, नवल कोळी, अशोक कोळी, पिना कोळी, मिलिंद कोळी, रतन वानखेडे, ग्रामसेविका सोनाली सोनवणे, संतोष तायडे, प्रकाश वाणी, तसेच उमेद महिला बचत गट आणि संत रविदास महाराज महिला बहुउद्देशीय बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळेला भेट देऊन देखभाल-दुरुस्तीची कामे आणि रंगरंगोटीची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *