बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगर येथील रहिवासी विनायक पाटील गुरुजी यांच आज दिनांक 1 /1 / 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, विनायक पाटील गुरुजी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांची प्रत्येकांच्या मनात वेगळीच नैतिक ओळख निर्माण झाली होती. विनायक गुरुजी यांना मुलगा नसल्याने आज त्यांच्या अंत्ययात्रेत एक वेगळे आदर्शवादी चित्र समाजाला दिसून आले ,गुरुजींना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या मुलींनी आपल्या जन्म दात्या पित्याच्या पार्थिवाला खांदा दिला. एवढेच नव्हे तर, मुलींनीच मुखाग्नी सुद्धा दिला. या सर्व घटनेला साक्ष म्हणून अंतयात्रेत सामील नातेवाईक, इष्ट मित्र, मंडळी हे सर्व गहिवरून गेले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात पिता-पुत्रीच्या नितळ प्रेमाचे चित्र सदर अंतविधी कार्यक्रमात दिसून येत होत्ते ज्याने एक आदर्शवादी शिकवण मुलींनी समाजाला दाखवून दिली. विनायक गुरुजी यांच्या पार्थिवावर मलकापूर येथील शिवाजी नगर येथील वैकुंठधाम मध्ये शनिवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘मला मुलगा नाही, माझ्या मुलीच माझं सर्व करतील’, असे गुरुजी नेहमी म्हणायचे. या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा दिला तर एक मुलीने मुखाग्नी दिला तेव्हा उपस्थित नातेवाईक, मित्र परिवारांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *