भारतीय संविधान दिनानिमित्त उमरखेड येथील डॉ. इकबाल नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक कन्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रभातफेरी, महापुरुषांच्या वेशभूषा, मानवी साखळी आणि सामूहिक प्रास्ताविक वाचन अशा उपक्रमांतून विद्यार्थिनींनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
उमरखेड येथे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. इकबाल नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक कन्या शाळेत भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शहरातील मुख्य चौकात नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. त्यानंतर परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारली होती. हातात संविधानाची प्रत आणि जनजागृतीपर फलक घेऊन विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधले. संविधानाची प्रत सुपूर्द करण्याचा ऐतिहासिक प्रसंगही विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिकातून सादर केला.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांनी एकत्र येत भव्य मानवी साखळी तयार केली. तसेच ‘आय लव्ह माय कॉन्स्टिट्युशन’ या सेल्फी पॉईंटवर संविधानाच्या पुस्तकासह छायाचित्रे काढून संविधानाप्रती अभिमान व्यक्त केला.
विद्यार्थिनींनी भाषणातून संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती दिली. तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याचा संदेश दिला. आकर्षक रांगोळ्यांनी सजलेल्या शाळा परिसरात ‘घर घर संविधान, हर घर संविधान’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद नईम सय्यद रज्जाक, उपाध्यक्ष सीमा बी. शेख इस्माईल, सदस्य मोहम्मद साजिदउल्ला मोहम्मद सनाउल्ला जहागीरदार (न. प. प्राधिकरण), सचिव राहत रोशन अन्सारी, शाइस्ता परवीन मेराज खान, करम खान युसूफ खान, रेशमा परवीन शेख इम्रान, तय्यबा बेगम फिरोज अहमद, इकबाल अहमद शेख अमीन, शेख मोहसीन शेख मुस्तफा, मोहम्मद कलीम अब्दुल अजीज, शबाना बी. तौफीक खान, जफरुल्ला खान मखमदजान खान, शाहीन परवीन शेख कय्युम, शेख इम्रान शेख रहीम, जहाँ आरा बेगम मुमताज अली सय्यद (शिक्षण तज्ज्ञ), शीरीन नाज हैदर अकील खान आणि शेख उस्मान शेख अहमद (शिक्षक प्रतिनिधी) यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख राहत रोशन अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये राहत रोशन अन्सारी, जुबेर अहमद खान नजीर मोहम्मद खान, इकरामुल्लाह खान करामतउल्ला खान, नवाब खान अमानुल्लाह खान, शेख उस्मान, जुनेद अयाज अहमद अजहर मुख्तार अहमद, सायमा बतुल मंसुरोददीन नवाब, शिरीन नाज हैदर अकील खान, शाईस्ता बेगम सय्यद कय्युम, नफिसा बेगम शेख अकील, शमीम बानो समीर अहमद, काशिफ अहमद वहीद अहेमद, फरहाना बेगम मजीद बेग, शेख मस्तान अब्दुल गणी, नाझनीन अकील मियाँ, शाहिदा बेगम मोहम्मद मुबश्शीर, बुश्रा झरीन शेख महेताब, अरसलानुद्दीन, शुजाओद्दीन फारुकी, फैजान खान, पीर खान झेबुन्निसा बेगम, अरशिया जहूर अली खान आणि अब्दुल गणी अब्दुल अजीज यांचा समावेश होता.
