“अत्याधुनिक कमलेश हॉस्पिटल रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरेल :- आमदार दिलीप मोहिते”

पुणे : अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे २४ तास अपघात व आपत्कालीन सेवा यांसह विविध स्पेशालिटी घेऊन कमलेश मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड ट्रॉमा केअर सेंटरचे मोशी आळंदी रोड, डुडुळगाव येथे आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील व आमदार महेश दादा लांडगे भोसरी विधानसभा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णसेवेचे अखंड व्रत घेऊन संदीप भसे व संतोष भसे यांनी कुटुंबासह या हॉस्पिटलची स्थापना केली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. जास्त बिल लावले तर आम्हाला मध्यस्ती करावी लागेल असे स्मितहास्य करून आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले

“भसे परिवाराने खेड हवेली तालुक्याच्या पंचक्रोशीतील रुग्णांसाठी या अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली. हे हॉस्पिटल भविष्यात रुग्णांच्या विश्वासास नक्कीच पात्र ठरेल असा विश्वास यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. या अत्याधुनिक हॉस्पिटलच्या उभारणीमुळे खेड तालुक्यातील तमाम रुग्णांना वाजवी दरात आरोग्यसुविधा मिळण्यास नक्कीच फायदा होईल. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीनआप्पा काळजे, माजी महापौर राहुल जाधव, खेड तालुका कृ.उ.बा. समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंतराव भसे, नगरसेवक राहुल कलाटे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रामशेठ गावडे, नगरसेविका विनयाताई तापकीर, नगरसेविका साधनाताई तापकीर, नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे, युवा नेते प्रदीप आबा तापकीर, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, कामगार नेते संतोष कापसे, कामगार नेते योगेश तळेकर, आळंदीचे मा. नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, राष्ट्रवादीचे युवा नेते नवनाथभाऊ तापकीर, नगरसेवक आदित्य घुंडरे, युवा नेते नितीन घुंडरे, उद्योजक सुरेश झोंबाडे समस्त भसे परिवार त्यांचे सर्व डॉक्टर टीम आळंदी चर्होली मोशी केळगाव डुडुळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तापकीर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *