वसमत तालुक्यातील पांदन रस्ते टाकणार कात
हिंगोली : मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते या योजनेच्या माध्यमातून शेतामध्ये जाणारे पांदन रस्त्याचे काम केले जात असून आज
हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी चे आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या मतदारसंघातील चिखली ते आडगाव (रंजे) बाराशे मिटर पांदन रस्त्याचे भुमिपुजन आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते नारळ फोडुन कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मोतीराम दादा बेंडे ,गजांनन नवघरे सर तसेच चिखली ग्रामपंचायत चे संरपच ,उपसरपंच, सदस्य,पोलिस पाटिल व गांवकरी उपस्थित होते