माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी सत्कार
हिंगोली: सेनगाव तालुक्यातील एका ग्रामीण भागातील गोरेगाव येथील रहिवासी असलेला एका शेतकऱ्याचा मुलगा विशाल कावरखे याने सुरवातीपासून काही तरी देशासाठी कराव या उद्देशाने जिद्द चिकाटीने सतत प्रयत्न करत तो थेट नागपुर सेंटर मधुन प्रथम क्रमांकाने पोलीस भर्तीत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस भरती मंध्ये निवड झाल्या बंद्दल विशाल कावरखेसह त्याचे वडील लिंबाजी कावरखे या दोघांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हिंगोली येथील निवासस्थानी शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल पाटील गोरेगावकर, युवा नेते रंणजित पाटील,विद्या शक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,डॉ कुलदिप पाटील,द्विज पाटील गोरेगावकर, गजानन पाटील गोरेगावकर शालिक टाले, यांनी पण विशाल कावरखेचा सत्कार करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.