हिंगोली : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती येथे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांना निवेदन देण्यात आले
महाराष्ट्रासह ईतर प्रत्येक गाव,शहर, जिल्हा तालुक्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातींचे विषारी बिनविषारी साप आढळतात सर्पमित्रांकडुन वारंवार नागरीकांना साप आढळताच मारु नका,साप शेतकऱ्यांसोबत अपले मित्र आहेत शेतात उंदीर जे शेतीपिकाचे नुकसान करतात त्यांना साप खातात यामुळे सापांना मारु नये साप आढळतात सर्पमित्रांना बोलवा असे आवाहन सर्पमित्रा कडुन केले जात आहे हिंगोली जिल्ह्यासोबत ईतर ही अनेक सर्पमित्र असुन या सर्पमित्रांना साप निघाला असता रात्री बे रात्री उशीरा स्व खर्चाने शहर,गाव, खेड्यांत दुरदुर जावे लागते त्यामुळे अपघात, तसेच साप पकडतांना साप चावा घेतला असता त्यांना उपचाराचा लागणार खर्च आणि ये जा करण्यासाठी लागणारे खर्च यासाठी सर्व सर्पमित्रांना अपघाती विमा, अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करुन मानधन देण्याची मागणी हिंगोली जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती येथे जाऊन राज्यमंत्री तथा जनशक्ती पक्षाचे संस्थापक ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांना निवेदन देत करण्यात आली यावेळी जनशक्ती पक्षाचे हिंगोली युवा जिल्हाप्रमुख रवी उर्फ राॅबट बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव, सर्पमित्र विजयराज पाटील, यांच्या सह ईतर जिल्ह्यातील सर्पमित्र उपस्थित होते.