अहमदनगर : ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आज नगर दौर्यात अहमदनगर महापालिकेला सदिच्छा भेट दिली. महापौर रोहिणी शेंडगे यांनी श्री. सानप यांचा यावेळी सत्कार केला.
सत्काराच्या छोटेखानी समारंभात श्री.सानप यांनी नगर विकासाकडे वाटचाल करणारे शहर असून, या शहराच्या विकासामध्ये महापालिकेचा मोठा हातभार असल्याने विद्यमान महापौर आणि सदस्यांवर त्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडली जाईल, असा विश्वास महापौरांचे अभिनंदन करतांना व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, समता परिषदेचे दत्ता जाधव, जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, ओबीसी जिल्हाध्यक्षा सुषमा पडोळे, राज्य उपाध्यक्षा वनिता बिडवे,नगरसेवक शाम नळकांडे, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, सुशिला सहानी, कैलास दळवी, संजय आव्हाड, जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, राजेंद्र पडोळे, अभिजित कांबळे आदि उपस्थित होते.