अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. श्री. किशोर देशपांडे तर उपाध्यक्ष पदी ॲड. फारूक बिलाल शेख यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर सेंट्रल वकील बार असोसिएशनची या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा ११.०१.२०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये माजी अध्यक्ष ॲड श्री सुभाष काकडे यांना निरोप देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची सण २०२२ ते २०२४ या कालावधी करिता निवड करण्यात आली आहे.
ॲड. किशोर देशपांडे यांची अध्यक्ष पदी तर ॲड. फारूक बिलाल शेख यांची उपाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच देखील पुढीलप्रमाणे सदस्यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष – ॲड विजय भगत, सेक्रेटरी- ॲड योगेश जयसिंग काळे, सह-सेक्रेटरी – ॲड बागेश्री मनोहर जरंडीकर, खजिनदार – ॲड अभिजित अरविंद देशपांडे, कार्यकारणी- ॲड तरीन शकुर शेख, ॲड विनायक सदाशिव सांगळे, ॲड – गौतम आदीनाथ कोल्हे, ॲड स्वप्नील सतीश बिहानी, ॲड शामसुंदर राधाकृष्ण दळवी, ॲड बाळासाहेब त्रिंबक पाटील, ॲड रोहित अनिल सिद्ध, ॲड सविता कथने, ॲड देवेंद्र बंब, निमंत्रित सदस्य – ॲड सुभाष काकडे तसेच वरीष्ठ विधिज्ञ ॲड अशोक कोठारी, ॲड विश्वासराव आठरे पाटील व ॲड सुभाष काकडे यांचे मोलाचे सह कार्य लाभले आहे.