उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील आलूर येथील हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी यांच्या उरुसानिमित्त आलूर येथे हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी पंच कमिटीच्या वतीने संदल मिरवणूकीला स्थगिती देण्यात आली, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून यावेळी पंच कमिटीच्या वतीने २०० मास्कचे वाटप करण्यात आले व संदल मिरवणूक न काढण्याचा निर्धार हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी पंच कमिटीने घेतला,११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता चादर चढवून नारळ फोडण्याचा मान शिवराज शंकरराव पाटील (पोलीस पाटील आलूर) व तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष संदिप झापा पवार व त्यांच्या पत्नी पुनमताई संदिप पवार यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली, व पंचायत समिती सदस्य गुलाब राम राठोड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी झापा पवार, सत्तार जेवळे, सत्तार सय्यदअली यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती, दि१२ फेब्रुवारी रोजी सकाळी महापूजा आणि सायंकाळी ८ वाजता हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी उरुसानिमित्त चादर चढवण्याचा मान तुळजाभवानी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप झापा पवार यांना व चेतन पवार(पत्रकार) यांना हा चादर चढवण्याचा मान मिळाला व महाप्रसाद वाटप करण्यात आले,

उरुसानिमित्त खेळणीचे सौंदर्यप्रसाधनाचे स्टॉल लावण्यात आले होते, हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी पंच कमिटीला तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने ११११/- रुपयेची देणगी देण्यात आली, उरूस यशस्वी करण्यासाठी उरूस कमिटीचे अध्यक्ष बशीर बटगिरे,उपाध्यक्ष गफ्फार अत्तार, सचिव खालिद कुरेशी, चेतन पवार, इसाक जमादार, सुभान जेवळे, आरिफ इनामदार, आरिफ जेवळे, महेबूब तांबोळी, आसिफ मकानदार, मुस्तफा मुर्शद, सादिक जमादार, बाबा जेवळे, साहिल गवंडी, सादिक जमादार, इसाक जमादार, महेबूब जेवळे, कलीम मुल्ला, आदींनी परिश्रम घेतले तर उरुसनिमित्त सर्व जातीधर्माचे भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *