यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन द्वारा आयोजित ‘वक्ता पिटीएचा’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरंभी येथील कु.अमृत संतोष चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या अद्वितीय यशामुळे पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मराठीवर चांगली पकड असलेल्या कु.अमृतने याआधीही अनेक वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवून यश मिळविले आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुलची इयत्ता 7 वीची विद्यार्थिनी कु. अमृत संतोष चव्हाण हिने आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 476 वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांवर मात करून अमृतने ‘अ’ गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ‘राजा शिवछत्रपती’ हा तिचा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *