ठाणे : जिल्हासह मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फाउंडेशन पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे काम प्रगतीपथावर तसेच नुकताच धानिवली गावांमध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षक सन्मान डॉक्टर सन्मान, तसेच पत्रकार सन्मान अशा विविध प्रकारचे उपक्रम राबवून या पत्रकार संघटनेने या तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर एक आदर्श असा उपक्रम घडून आणल्याने या संघटनेने नवा आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत पांढरे यांनी धानिवली येथे आयोजित केलेल्या गौरव महोत्सवाच्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुपरस्टार पत्रकार संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष बाळासाहेब भालेराव होते.

व्यासपीठावर ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड तहसीलदार संदीप आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, टोकावडे ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, मुरबाड पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी संजय थोरात, पत्रकार नंदकुमार मलबारी, पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह परिसरातील शिक्षक वर्ग डॉक्टर वर्ग गावातील तरुण वर्ग व तसेच वृद्ध मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात मुरबाड तहसीलदार संदीप आवारी यांनी सांगितले प्रथमच अशा प्रकारचा गौरव महोत्सव कार्यक्रम राबविला गेला आहे या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन अशाच प्रकारचा कार्यक्रम मी माझ्या गावाकडे साजरा करणार तसेच या पत्रकार संघटनेच्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात वरील मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघटनेच्या २५ पदाधिकाऱ्यांना तसेच सदस्यांना ओळखपत्र वितरण सोहळा करण्यात आला.तसेच शिक्षक सन्मान, डॉक्टर सन्मान, रुग्ण सखी सन्मान यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक व नियोजन संस्थापक/ अध्यक्ष बाळासाहेब भालेराव व महाराष्ट्र डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र भोईर यांनी केले.