गडचिरोली : जागतिक महिला दिनानिमित्त अहेरी तालुक्यातील पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे मा.पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सा.संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुजीतकुमार क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ” जागतिक महिला दिनानिमित्त” भव्य बेबी मडावी-महीला मेळावा-2022 चे आयोजन करण्यात आले.

सदर महीला मेळाव्यास अध्यक्ष म्हणून रेगुलवाही येथील महीला सरपंच कु. ममीता नैताम व सौ. मनीषा जायभाये हया उपस्थित राहून यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. मेळाव्या दरम्यान पोमके मरपल्ली येथील 10 अंगणवाडी सेविका,04 आशा स्वयंसेविका,व रेगुलवाही येथील महिला सरपंच यांचा शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच महिला मेळाव्या दरम्यान *10 गरोदर मातेला बेबी केयर कीट वाटप करण्यात आले.

सदर मेळाव्यामध्ये श्री. पिंपळे नेत्र चिकीत्सा अधिकारी,कमलापूर यांनी 80 नागरीकांची नेत्र तपासणी केली त्यापैकी 35 नागरीकांना मोती बिंदू ऑपरेशन व 20 नागरीकांना चष्मे वापरण्या बाबत सांगितले..तरी सदर 35 नागरीकांना याच आठवड्यात शासकीय रुग्णालय,गडचिरोली येथे ऑपरेशन करीता पाठविण्यात येणार आहे. उर्वरित 20 नागरीकांना चष्मे तयार करुन आणुन वाटप मू मेळावा दरम्यान पोलीस अंमलदार रोहित मोरे यांच्या पत्नी सौ. मोरे यांनी महीला दिनानिमित्त मार्गदर्शन पर भाषण केले.आम्ही स्वतः पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून चालवत असलेल्या शासकीय योजणांची व महिला व बालक यांच्या विषयीच्या कायद्या बद्दल मार्गदर्शन केले.सर्व उपस्तितांना जेवण देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

सदर मेळाव्या करीता पोलीस मदत केंद्र मरपल्ली हद्दीतील जेष्ठ तसेच प्रतिष्ठित महीला, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र मरपल्ली येथील स्टाफ व हद्दीतील असे 175-200 महीला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमस पोउपनि. संतोष जायभाये, प्रभारी अधिकारी मरपल्ली.पोउपनि.राम बारहाते,पोउपनि. प्रविण सोनवणे व सर्व जिल्हा पोलीस अंमलदार तसेच रा. रा. पोलीस बल गट 1 पुणे यांचे पोउपनि. कुरकुटे सा. व अंमलदार यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *