गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मदर तेरेसा प्रभाग संघ कमलापूर अंतर्गत वार्षिक अधिवेशन व जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियंका सोनटक्के तालुका अभियान व्यवस्थापक तर प्रमुख अतिथी म्हणून टेम्बुरने बिओआय शाखा गडचिरोली, बोलगमवार बीओआय शाखा व्यवस्थापक अहेरी, डॉ.उईके वैद्यकीय अधिकारी कमलापूर,सतीश उमरे, एकता उमरे, डोर्लीकर,लुलारे, बावणे, लक्ष्मी श्रीरामवार प्रभाग संघ अध्यक्ष, सपना मारकवार प्रभाग संघ सचिव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियंका सोनटक्के यांनी आपल्या भाषणात स्त्रियाचं अस्तित्वाचा सन्मान व आर्थिक उन्नती विषयी मार्गदर्शन केले. स्त्री बद्दल आज पुरुषांचे मानसिकता बदलायला सुरुवात झाली आहे.ही समाधानाची बाब आहे.महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक बचत व नियोजन करणे शिकत असून महिलांनी सक्षम होत आहेत.आज पुरुषांप्रमाणे प्रत्येक विभागात महिलांनी कार्यरत आहेत हा महिलांचा गौरव आहे.असे प्रतिपादन केले. टेम्बुरने यांनी बँकेचे विविध योजनांचे माहिती दिली व कर्जाची परतफेड, वसुली, उद्योग धंदे,आर्थिक उन्नती यावर मार्गदर्शन केले. महाजीविका अभियानाविषयी माहिती देण्यात आले.कमलापूर आरोग्य विभागाने स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात महिलांचे स्पर्धात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा घेण्यात आले.या वार्षिक अधिवेशन व जागतिक महिला दिन कार्यक्रमात मरनेली,राजाराम, छलेवाडा, गुड्डीगुडम, कमलापूर परिसरातील स्वयंसमूहातील महिला २०० ते २५० संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घननिळा ओनपाकला तर आभार प्रदर्शन माया आईला यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीकरिता भारती भट्ट, प्रेमीला दुर्गे,जयवंता गोलेटी,मंगला आत्राम, रेखा दुर्गे, वनिता रामटेके, सरिता बामनकर, सुमित्रा गावतुरे, जयश्री आत्राम यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *