गडचिरोली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे सुहास उभे फ्रॅन्टल व सेल विभाग समन्वयक आज सिरोंचा दौऱ्यावर आले असुन त्यानी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या कार्यकर्ताच्या बैठक तहसिल स्तरावरील विविध समस्या विषयी चर्चा केले आहे सिंरोंचा येथे झालेल्या या कार्यकर्ता बैठकीत सिरोंचा तालुक्यातील विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आले.


सिंरोचा तालुक्यातील एकही शासकीय कर्मचारी ग्रामीण स्तरावर मुख्यालय उपस्थित राहत नाही . आरोग्य विभागात पद भरती नाही औषध साठा उपलब्ध नाही .अध्याप वनहक्क पट्टे मिळाले नाही. बामणी प्राथमिक आरोग्य पंथकास प्राथमिक आरोग्य केद्र देण्याची मागणी.विविध प्रकारच्या विकास कामा करीता व आवास योजनेतील बांधकामसाठी रेती उपलब्ध करून देण्याविषयी, बामणी व टेकडा येथे राष्ट्रीयकृत बॅंक एटीएम करीता मागणी. ग्रामीण क्षेत्रात नेटवर्कचि सुविधा नाही. व ईटरनेट सुविधा नाही .महिलासाठी रोजगार उपलब्ध नाही. वर्ग दोनचा जमिन एक करण्यात यावी. ग्रामीण भागातील रस्ते सुधारणा करण्यात यावीअशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आले व त्याच्या ठिकाणावरून सुहास उभे संबंधित अधिकाऱ्यांना बसले ठिकाणावरून भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले यावेळी रवींद्र वासेकर जिल्हा अध्यक्ष रा. का. गडचिरोली भाग्यश्री ताई आञाम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली, शाहीन बाबी हकीम महिला रा.का. जिल्हाध्यक्ष एड. सचिन जाधव, मधुकर कल्लूरी तालुका अध्यक्ष रा. का. यांच्या बबलू भैया हकीम ज्येष्ठ कार्यकर्ते नेते श्रीनिवास विरगोनवार, कपिल बागडे कार्यकारी अध्यक्ष गडचिरोली माजी पंचायत समिती सदस्य समया, कुळमेथे रवींद्र कारसपली ग्रामपंचायत सदस्य आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *