औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेच्या ड यादीं मधे समाविष्ट न केल्या मुळे अनेक गोरगरीब, शेतमजुर, शेतकरी, अनुसुचित जाती जमातीचे गरजु लाभार्थी घरकुल आवास योजनेपासून वंचित राहिलेत सावळदबारा येथील काही राजकीय पुढा-यांनी मनमानी करुन चक्क घरात बसुन प्रधान मंत्री घरकुलआवास योजने ची ड यादी त्यांच्या मर्जीने तय्यार करुन आॕनलाईन करुन पंचायत समिती सोयगाव येथे पाठविण्यात आली आणि ती घरकुलाची यादी मंजुर होऊन आली तीच यादी सावळदबारा ग्रामपंचायत मधे ग्रामसभा घेऊन सावळदबारा ग्रामस्थ यांना चावडी वाचन करुन दाखविली परंतु सावळदबारा ग्रामपंचायत खुप छोटी ग्रामपंचायत असल्यामुळे मोजकेच ग्रामस्थ ग्रामपंचायत मधे बसलेले होते तर अनेक ग्रामस्थ बाहेर उन्हामधे उभे तपताना दिसुन आले यामुळे गावकरी संतप्त दिसुन आले
या घरकुल यादींमधे मोठ्या प्रमानात धनदांडगे , पैशावाल्यांचे , आणि आजी माजी नेते पुढा-यांची नावे आणि त्यांच्या नातेवाईकांचे नावे या घरकुल यादींमधे समाविष्ट करण्यात आले आहे सावळदबारा हे गाव अजिंठा डोंगर द-यांमधे आदिवासी बहुल भागामधे अजिंठा डोंगर पर्वताच्या पायथ्याशी औरंगाबाद जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला बसलेले गाव आहे त्यामुळे शासनाने ,प्रशासनाने लक्ष देण्याची खुप आवश्यकता आहे या घरकुल यादीमधे गोरगरीब , शेतमजुर, अल्प भुधारक , शेतकरी , अनुसुचित जाती , अनुसुचीत जमाती, च्या गोरगरीब गरजु लाभार्यांना वंचीत ठेऊन फक्त तीनशे एक लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आणि अनेक गरजु लाभधारकांना या घरकुल यादी पासुन वंचित ठेवण्यात आले
या घरकुल यादींमधे सर्वात जास्त तर राजकीय पुढारी, धनदांडगे, पैशावाल्यांचा आणि नातेवाईकांचा समावेश दिसुन येत आहे असे वंचित ठेवण्यात आलेल्या लाभार्थी ग्रामस्थांमधे बोल्ले जात आहे सावळदबारा हे गाव अठरा गावांचे केंद्र आहे या गावातील लोकसंख्या खुप मोठी जास्त प्रमानात असुन सुद्धा नेमकी तीनशे एक लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती ला का पाठविण्यात आली त्यामुळे या वंचीत ठेवण्यात आलेल्या लाभार्यांवरती खुप मोठा अन्याय झालेला आहे त्यामुळे सावळदबारा ग्रामस्थांमधे मोठा संताप निर्माण होऊन खुप मोठी नाराजी दिसुन आली आहे या गोरगरीब , शेतमजुर , अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती च्या वंचीत ठेवन्यात आलेल्या लाभधारकांना या घरकुल यादीमधे समाविष्ट करुन न्याय मिळेल का ? का असेच वंचीत ठेवन्यात येईल हा मोठा प्रश्न सावळदबारा ग्रामस्थांना पडलेला आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद