मा.पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते उदघाटन*

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मरपली ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या करंचा येथे राज करेंगा गोंड क्रिकेट क्लब यांच्या कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी प.स.सदस्य सौ.शारदा कोरेत, राजारामचे सरपंच श्री.नागेश कन्नाके,माजी सरपंच श्री.हंनमतू कोरेत,ग्राम पंचायत सदस्य श्री.आनंदराव कोंडागूर्ले,सुनंदा मूडमाडगेला,सुनील तोगम,श्रीनिवास मडावी,दिवाकर आलाम,तिरुपती दुर्गे,होते. तर कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री.श्रावण कोंडागूर्ले यांनी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद कोरेत,उपाध्यक्ष अंकित आत्राम, श्री.आविनाश आलाम,साधु कोरेत,संतोष तुमडी,वासुदेव कोरेत व गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *