कोरेपल्ली येथे माजी जि.प. अध्यक्ष- भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते हॉलीबॉल सामन्यांचे उदघाटन

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील येरमणार ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मौजा- कोरेपल्ली येथे भव्य व्हॅलीबाल सामन्यांचे उदघाटन, माजी जि.प. अध्यक्ष- भाग्यश्री आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष- सौ. भाग्यश्री ताई आत्राम हे कोरेपल्ली गावात आगमन होताच सर्व कोरेपल्ली गाववासीयांनी आदिवासी समाजाचे पारंपरिक पाहईंग वाजवत व रेल्ला पाटा मनात भव्य स्वागत केलेले आहे.

यावेळी व्हॅलीबाल समनेच्या अध्यक्ष- श्री दामा गावडे – गाव भुमिया कोरेपल्ली, सहअध्यक्ष- श्री इरपा गावडे- गाव पेरमा कोरेपल्ली, उपाध्यक्ष- श्री मासा गावडे- प्रतिष्ठित नागरिक कोरेपल्ली हे होते. तसेच मौजा- कोरेपल्ली गावाचा व्हॅलीबाल उदघाटनीय कार्यक्रमात, श्री बी.वाय. सोयाम सर- मुख्याध्यापक जि.प. शाळा कोरेपल्ली, कु.जी. आर.मोतकूरवार मॅडम- शिक्षिका कोरेपल्ली, श्री येडलावार साहेब- वनपाल कोडसेपल्ली, कु. ममीता गावळ मॅडम- वनरक्षक, श्री मनोज गावडे- कोतवाल कोरेपल्ली हे उपस्थित होते. व्हॅलीबाल सामन्यांचे उदघाटनिय कार्यक्रम झाल्यानंतर पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रामधील कार्यकर्ता बैठक घेण्यात आला.

यावेळी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करतांना माजी जि.प. अध्यक्ष- सौ.भाग्यश्री आत्राम ( हलगेकर ) म्हणाले की, कोरेपल्ली गावासोबतच पेरमिली- राजाराम क्षेत्रामध्ये येणारे सर्व गावातील समस्या सोडविण्यासाठी आपले अहेरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी आपले क्षेत्रातील लोकांचा व गावातील विकास कामांना सुरू केलेले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा शेत जमीन मोजणी व स्थानिक आमदार निधी मधून अनेक गावांत आदिवासी गोटूल व सभा मंडप मंजूर झालेले आहे. म्हणून पेरमिली-राजाराम क्षेत्रातील नागरिकांनी माननीय आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्या सोबत जुडून राहा. आणि आप- आपले गावाचा विकास कामे करा.कारण आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचे आमदारकी हे अजून अडीच वर्षा पूर्ण आहे. म्हणून तुमचे कामे फक्त माननीय धर्मरावबाबा आत्राम साहेब हेच करणार आहे. कारण अहेरी विधानसभा क्षेत्रातील बाकी सर्व लोकप्रतिनिधींचे कार्यकाळ संपलेले आहे.

माननीय आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेब आणि आम्ही सगळे तुम्हा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहू असे मार्गदर्शनात सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांनी म्हणाली आहे. यावेळी उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख- श्री लक्ष्मण येररावार, येरमणार चे माजी सरपंच- श्री बालाजी गावडे, कामलापूरचे माजी सरपंच- श्री संबय्या करपेत, राजाराम चे माजी सरपंच- विनायक आलाम, श्री मंतय्या आत्राम सामाजिक कार्यकर्ता, श्री बाबुराव तोर्रेम- सामाजिक कार्यकर्ता, श्री तिरुपती कुळमेथे, सामाजिक कार्यकर्ता, श्री अनिल दुर्गे- सामाजिक कार्यकर्ता कोरेल्ली बु., श्री देवाजी सडमेक- सामाजिक कार्यकर्ता पेरमिली, राजाराम चे ग्रा.पं. सदस्य- सौ.पुष्प तोर्रेम, सौ. सपना मारकवार, माजी ग्रा.पं. सदस्य- सौ.अनिता आलाम, कामलापूरचे माजी उपसरपंच- श्री शंकर आत्राम, येरमणार चे माजी उपसरपंच- श्री पोच्या तलांडी, श्री पराग पांढरे, श्री शंकर नैताम, श्री सुरेश आत्राम, श्री चंदू तलांडी, श्री लालचंद तलांडी, श्री मंगेश आत्राम, श्री मासा गावडे, श्री बाबुराव तलांडी, श्री तुकाराम इष्टम, श्री मलाय्या सकाटी, श्री सदू पेंदाम, श्री शैलेश गेडाम, श्री मजोन मडावी, श्री दामा आत्राम, श्री लक्षण आत्राम, श्री सुधाकर वेलादी, कोरेपल्ली चे श्री झुरू गावडे, श्री संभा गावडे, श्री मादी, कुळमेथे, श्री सुधाकर गावडे, श्री राजू कुळमेथे, श्री साधू गावडे, श्री डोलू गावडे, श्री सतीश आत्राम, श्री मासा आत्राम आणि संपूर्ण कोरेपल्ली गावातील महिला व पुरुषांसह पेरमिली- राजाराम क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *