बुलढाणा : महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष लोणार नगर परिषदेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर जाणीवपूर्वक अन्याय करत असून काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगर पालिकेतील गटनेते प्रा. बळीराम मापारी यांनी केला आहे.

महाराष्ट्रात सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने व भाजपाने शिवसेना पक्षाला मुख्यमंत्री पद नाकारल्याने भाजपा आणि शिवसेना मध्ये बेबनाव झाला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी निवड करण्यात आली त्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी तयार झाली व प्रत्येक ठिकाणी एकत्र निवडणूका लढून विजय मिळवला. परंतु, या महाविकास आघाडीत लोणार नगर परिषदमध्ये बिघाडी दिसून आली. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्र सता असता त्यांनी मात्र आघाडी धर्म पाळला नाही मागील वेळी सुद्धा स्थायी समिती च्या निवडणूका पार पडल्या त्या वेळी शिवसेनेला समिती देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र शेवट पर्यंत हो म्हणून नंतर समिती दिली नाही त्या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल बॉंद्रे यांच्या सोबत चर्चा केली असूनही आम्हाला समिती पासून दूर ठेवण्यात आले.

५ एप्रिल रोजी स्थायी समितीच्या निवडणूका असल्याने जिल्हाध्यक्ष राहुल बॉंद्रे यांच्या सोबत चर्चा झाली. त्यांनी त्या नंतर त्यांनी आमच्याकडे बहुमत असल्याने सर्वच समित्या आमच्या कडे ठेवणार असल्याचे सांगितले या मध्ये सुद्धा आम्हाला शेवट पर्यंत २ समिती देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र नंतर आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आम्ही तुम्हला समिती देणार नसल्याचे सांगितले त्या मुळे शिवसेना पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला व आम्ही सर्व मिळून खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या सोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ अशी माहिती लोणार येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये शिवसेना गट नेते जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी दिली या वेळी कृषिउत्पन बाजार समिती सभापती संतोष मापारी नगरसेवक डॉ. अनिल मापारी, छगन कंकाळ, युवासेना तालुका अध्यक्ष गजानन मापारी, धर्मचंद लुनिया, गजानन जाधव उपस्थित होते.

काय आहे नाराजीचे कारण ?

लोणार नगर परिषदेच्या स्थायी समितीची निवड ५ एप्रिल रोजी नगरपरिषद मध्ये पार पडली ही निवडणूक काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात पक्ष निरीक्षक अशोक पडघान यांच्या उपस्थितीत मध्ये गटनेते भुषण पाटील मापारी यांनी अविरोध केल्या. यामध्ये शिक्षण समिती ही नगरपरिषद उपाध्यक्ष बादशाह खान, पाणीपुरवठा सभापती म्हणून संतोष शेषराव मापारी, बांधकाम सभापती म्हणून नसीमा बानो मोहम्मद तोफिक कुरेशी तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून ज्योत्स्ना गुलाबराव सरदार यांची अविरोध निवड करण्यात आली. हे सर्व जण काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत. लोणार पालिकेत शिवसेना हा काँग्रेसचा मित्रपक्ष असून देखील या पक्षाच्या वाट्याला एकही सभापती पद आले नसल्याने शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळेच लोणार नगरपरिषद मध्ये ५ समित्या असतांना व महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी सरकार असतांना सुद्धा मग लोणार नगरपरिषद मध्ये असा दुजा भाव का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *