डोणगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा सर्कल मेळावा

बुलढाणा : शेलगाव देशमुख तालुका मेहकर येथे दिनांक 9 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी चा सरकल मेळावा पार पडला या मेळाव्यास जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ जाधव डॉक्टर बाबाराव वाघ तालुका सल्लागार बबनराव वानखेडे तालुका अध्यक्ष शेख मोबीन शेख यासीन यांची उपस्थिती होती

बबनराव वानखेडे यांनी प्रास्ताविक करून मेळाव्यास सुरुवात केली त्यानंतर बाबाराव वाघ यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले जिल्हा अध्यक्ष यांनी बहुजन आघाडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याचे आवाहन करून जास्तीत जास्त जागा कशा प्रकारे निवडून आणता येतील याकडे लक्ष द्यायचे आवाहन केले मेळाव्याचे सूत्रसंचालन शुद्धोधन रामराव सदार यानी केले व मेळाव्याचे आयोजन अण्णा मोरे किशोर वाघमारे यांनी केले होते सदर मेळावा डोणगाव येथील आमले मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी धोंडू सदार समाधान मोरे गजानन चव्हाण राहुल कांबळे शेषराव तोतरे हे उपस्थित होते आभार संदीप सदार यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *