बुलढाणा : गेल्या विस वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाला सत्य व निर्भिडपणे आपली लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणारे एकमेव पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी 2021 -2022 चा गुरु रविदास जिवन गौरव विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष संजय खामकर व महासचिव सुर्यकांत गवळी यांनी केली होती गुरु रविदास जयंतीच्या निमित्ताने कात्रज पुणे येथील सभागृहात दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,

या वेळी दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक तथा पत्रकार संरक्षण समीतीचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, परमपुज्य धर्मगुरु निरंजनदास महाराज,सुखदेवजी महाराज, जेष्ठ साहित्यिक रतनलालजी सोनाग्रा,तरसेमलाल सेवादार संजय खामकर, गोविंद खटावकर,लक्षणराव घुमरे यांच्या हस्ते शाल सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे त्यांनी आपल्या निर्भिड व दमदार लेखणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली असुन राजकीय व्यक्तींसह प्रशासनावर त्यांचा विशेष अंकुश असतो तर या त्यांना या अगोदरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *