बुलडाणा : मलकापूर (२७) मलकापूर नगर परिषदेचे निलंबित चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अनंत मनोहर चव्हाण हे आपल्या न्यायपूर्ण मागण्यांचे संदर्भात दि.२५ पासून मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते.

याबाबत “समतेचे निळे वादळ” या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी मा.तहसिलदार तथा नप प्रशासक श्री सुरडकर व मुख्याधिकारी श्री रमेश ढगे यांच्या सोबत समर्पक चर्चा केली.या चर्चेस अनुसरून आदेशाने श्री अनंत चव्हाण यांना न्यायपूर्ण कार्यवाहीचे आश्वासन दिले.तसेच मुख्याधिकारी श्री ढगे यांच्या लिखीत आदेशान्वये कर्तव्यावर रुजू होण्याचा सल्ला दिला तसेच मुख्याधिकारी यांनी दिलेल्या पगारवाढ रोखून धरण्याच्या आदेशाला तहसिलदार तथा प्रशासक नप मलकापूर यांच्याकडे अपिल दाखल करण्यासाठी सांगितले व आपल्यावर अन्याय होऊ देणार अशी हमी दिल्याने श्री चव्हाण यांनी श्री अशांतभाई वानखेडे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी उपोषण मडपात सर्वश्री नामदेव तारकसे,दिलीप जगताप व सेवानिवृत कर्मचारी संघटनेचे मोहंमद रफीक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *