सचिन बिद्री:उस्मानाबाद
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील प्रांजल प्रवीण माटे हिने इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा रँक मिळवीला आहे.

ती सध्या उमरगा येथील डॉ. कुशाबा धोंडिबा शेंडगे सीबीएसई स्कूल येथे इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून तिला महाराष्ट्र व गोवा झोनमधून झोनल सुवर्णपदक मिळाल्याने ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सचिन शेंडगे, मुख्याध्यापिका आशा चोकडा, नारायणी, पल्लवी जाधव, काशीनाथ माने आणि मित्रपरिवारातून कौतुक होत आहे.