प्राणीमित्रांकडून बचाव अभियान:पक्षाला मिळाले जीवदान
उस्मानाबाद : (सचिन बिद्री) उमरगा
शहरातील महामार्गालागत डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स समोर आकाशातून अचानक पक्षी जमिनीवर कोसळला, दुकानदार उत्सुकतेने जवळ गेल्यावर सदर पक्षी हा कबुतर असल्याचे आढळून आले व त्यांनी लागलीच प्राणीमित्र दिनेश किर्मिडे यांना बोलावले. श्री दिनेश किर्मिडे यांनी या पक्षाला घेऊन जनावरांच्या रुग्णालयात दाखल झाले तेंव्हा तेथील डॉ सुलेमान दायने बाहेर असल्याचे समजले पण फोन वर संपर्क साधला असता शहरातील खाजगी औषध दुकानावर जाण्यास सांगितले. काही क्षणात डॉ सुलेमान या दुकानावर हजर होऊन कबूतराची तपासणी केली व काही द्रव्य स्वरूपातील औषधें त्यास पाजले तेंव्हा कबुतर काही प्रमाणात हालचाल करू लागला. उष्माघाताने हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन दिवस सदर काबूतराची निगराणीची जबाबदारी प्राणीमित्र श्री किर्मिडे यांनी स्वीकारली आहे.

एन टी व्ही न्युज वृत्तवाहिनी तर्फे या “आग” ओकणाऱ्या उन्हाळ्यात जनतेमध्ये जनजागृतीपर काही बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्यात आवर्जून शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पक्षांकरिता राबविण्यात आलेले उपक्रम आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या मियावाकी जंगलात विद्यार्थ्यांनी पक्षांना पाण्याची सोय व्हावी या हेतूने जंगलात राबविण्यात आलेले उपक्रम. एकंदरीत पुन्हा आव्हान करण्यात येते की आपल्या घराच्या अवतीभवती, गच्चीवर, झाडावर शक्य होईल तेथे पक्षांना सहज रित्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने पाण्याने भरलेली भांडी ठेवुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पक्षांना मोठा आधार होईल.