नौकरी करताना, छंद जोपासला हाच विरंगुळा.

(सचिन बिद्री – उमरगा)

उस्मानाबाद : आयुष्य जगताना प्रत्येक व्यक्तीला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, जबाबदाऱ्या म्हटलं की काबाड कष्ट, मेहनत सुख आणि दुःख(चढ उतार)आले पण जगण्याची धडपड प्रत्येक मानव करतोच त्यात जगताना आपल्या बालपणापासून मनात असलेली इच्छा आकांक्षा जोपासणे हे प्रत्येकाला शक्य नाही.जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतः च आयुष्य माणूस जगायचचं विसरून जातो हे कटू सत्य आहे. या अश्या धावपळीच्या युगातही असे काही दिलखुलास व्यक्तिमत्व आढळून येतात की जे आपल्या परिवाराचे जबाबदारी व्यवस्थित पार पाडीत,स्वतः चा आयुष्य ही दिलखुलास पणे हसत खेळत तणाव मुक्त जगतात.असा एक पोलीस अधिकारी उमरगा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत श्री संजीवन गोरख शिंदे. तीस वर्षे पोलीस प्रशासनात उत्तम निष्कलंक सेवा देत परिवारातील मुला मुलींचे उच्चशिक्षण देत चांगले संकार दिले त्यामुळे पारिवारिक सुख निर्माण झाले तर पोलीस म्हणून एक उत्तम समुपदेशक म्हणून उमरगा पोलीस ठाण्यात ख्याती मिळविली. सध्या चौरस्था बिट अंमलदार म्हणून श्री शिंदे सेवा देत असतानाच उत्तम बाईक राईडर म्हणून ओळखले जातात.नेपाळ,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लदाख, रामेश्वरम, पंजाब असे जवळपास भारताच्या कानाकोपर्यात त्यांचा बाईकवर प्रवास झाला असून देशाच्या बाहेरही त्यांचा प्रवास झालाय, जवळपास ३५०००(पस्तीस हजार किलोमीटर) बाईक राईड करणारे उस्मानाबाद जिल्हा पोलिस प्रशासनातील एकमेव पोलीस ठरले आहेत.
श्री संजीवन शिंदे यांच्या या बाईक राईडर या त्यांनी जोपासलेल्या छंद मुळे भारताच्या प्रत्येक राज्यातून काही नवे मित्र(बाईक राईडर) जोडले गेले.दि १७ एप्रिल रोजी महाबळेश्वरहुन तेलंगणा राज्यात जाताना दोन बाईकस्वार उमरगा पोलीस ठाण्यात श्री संजीवन शिंदे यांना मोठ्या आपुलकीने भेटायला आले.ते दोन्ही बाईकस्वार हे उच्चशिक्षित तरुण असून त्यापैकी एक टी सी एस कंपनीत उच्च पदावर कार्यरत तर दुसरा ऍमेझॉन कंपनीत उच्चपदावर असल्याचे समजले. यावेळी काही क्षणासाठी तामिल व महाराष्ट्र एकत्र गळाभेट घेत आहेत असे चित्र दिसत होते.यावेळी उमरगा पोलीस श्री नागनाथ वाघमारे, तानाजी शिंदे, चालक खतीब, लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.

बाईक चे वैशिष्ट्य

४०० सी सी पासून ८०० सी सी च्या या दुचाकी होत्या तर राईडर पूर्ण पणे सुरक्षित असल्याचे दिसले.उच्च प्रतीचे हेल्मेट व त्याला कॅमेरा लावलेला आणि त्या हेल्मेट मधेच सर्व अशी यंत्रणा होती की सर्व बाईक राईडर एकमेकांच्या संपर्कात राहण्याहेतु वायरलेस भ्रमणध्वनी असल्याचे निदर्शनास आले.
छंद औषधासारखं काम करतो. आगळावेगळा छंद जोपासल्यास एक वेगळी ओळख निर्माण करता येते. जीवनात आनंद मिळवण्यासाठी एकतरी छंद माणसाने जोपासायला नक्की हवा.हा छंद पुस्तक वाचन्याचा, नृत्य करण्याचा, गाणे म्हणण्याचा, व्यायाम करण्याचा वेगवेगळे असू शकतात पण प्रत्येकाला जोपासता येत नाही त्यामुळे आयुष्य जगताना कंटाळवाणा किंवा दडपणात आल्यासारखा भास होतो. त्यामुळे आपण आहे त्या क्षेत्रात कार्य करत करत,आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना एखादा छंद नक्की जोपासा त्यामुळे जगण्याचा एक वेगळाच आनंद येईल हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *