उस्मानाबाद : शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मधील तंत्रस्नेही शिक्षक संजय रूपाजी यांनी जिल्हा परिषद हायस्कूल चे गुगल प्लेस्टोअर वर शाळेच्या नावाचे अप्लिकेशन तयार केलेले आहे. यामुळे शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती, शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना पण घर बसल्या माहिती ॲप वर उपलब्ध होणार आहे .शाळेत चाललेले विविध उपक्रम ,सूचना फलकावर लावलेल्या सूचना, अभ्यास विषयक साहित्याची माहिती, विविध विभाग प्रमुखाची माहिती,वार्षिक परिक्षेचा निकाल , विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी च्या सर्व शैक्षणिक बाबी या ॲप वर उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. शाळेचे स्वतंत्र ‘प्ले स्टोअरवर’ ॲप्लिकेशन उपलब्ध झाल्याने शाळेच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे व सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी सांगितले या ॲप्लिकेशनवर विद्यार्थी व पालकांना शाळेच्या प्रगती विषयी माहिती घेता येणार आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी,पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर शाळेची सर्व माहिती ॲपवर मिळणार आहे .यापुढे या ॲपचा वापर शाळेतील सर्वच विद्यार्थी व पालक नियमित पणे करावे अशी अपेक्षा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकुंतलाताई मोरे यांनी व्यक्त केली असून यासाठी शाळेतील शिक्षक धनराज तेलंग ,बशीर शेख, बाबासाहेब जाधव, बलभीम चव्हाण, चंद्रशेखर पाटील, सदानंद कुंभार, सोनाली मुसळे ,ममता गायकवाड, सरिता उपासे, शिल्पा चंदनशिवे यांनी रुपाजी सरांनी तयार केलेल्या अॕप्लिकेशन चा विद्यार्थी व शिक्षकांना खूपच फायदा होत असल्याचे सांगितले.

“गुगल प्लेस्टोअरवर zphs omerga या नावाने आमच्या शाळेचे अॕप उपलब्ध आहे.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हे अॕप डाऊनलोड केलेले आहे.आम्ही पालक शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक व अधिकारी वर्ग यांनाही अॕप डाऊनलोड करण्यासाठी विनंती करणार आहोत.आॕनलाईन शिक्षणासाठी ही शाळेची खूप मोठी उपलब्धी असून आमच्या साठी अभिमानाची बाब आहे.”–पद्माकर मोरे मुख्याध्याप

(सचिन बिद्री:उमरगा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *