लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तब्बल १२१ जणांनी रक्तदान केले विशेष म्हणजे यात महीला कर्मचारी यांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता. दरम्यान बँकेच्या वतीने सोमवारी पाणपोई चा शुभारंभ बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्ही सामाजिक उपक्रमास बँकेचे अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत बाजूलगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोईज शेख, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते

बँकेची रक्तदानाची अविरत सेवा अभिमानास्पद

यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख यांनी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २० वर्षापासून रक्तदान शिबिर घेत आहेत. यामुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो असे नावीन्य उपक्रम निश्चित समाजाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करून बँकेच्या कर्मचारी अधिकारी यांचे कौतुक केले.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक माजी उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अशोक गोविंदपुरकर, अँड राजकुमार पाटील, मारोती पांडे, अनुप शेळके, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, तज्ञ संचालक सुनिल कोचेटा, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, नारायणराव लोखंडे, उदयसिंह देशमुख, विजयकुमार पाटील, उपस्थित होते.

प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्यूज मराठी लातूर
9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *