उस्मानाबाद : येडशी  येथे रविवारी बारोतीयो के साथ ८८ व्या मन कि बात भागाचे कार्यक्रम आयोजन विवाह सोहळ्यात करण्यात आले.    येडशी येथील अरुण डुमणे यांचा मुलगा मयुर व कुर्डुवाडी येथील रमेश माने यांची मुलगी तृप्ती यांचा विवाह रविवारी साडे बारा वाजता पार पडला या विवाहापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन मन कि बात चे जिल्हाअध्यक्ष व भाजप जिल्हा उप अध्यक्ष डॉ प्रशांत पवार यांनी केले होते.

   यावेळी मंगल कार्यालयात स्टेज वर टी व्ही लावण्यात आला होता तसेच व्हराडी मंडळीनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संग्रहालय,युपीआय पेमेंट, दिव्यांग पेंटिंग, जलसंकट, जल संवर्धन व शुन्य चा शोध ,वेद्यिक गणीत अशा विविध गोष्टी ची माहिती दिली हा कार्यक्रम वधु व वर पक्षाकडून ऐकण्यात आला. यावेळी डॉ प्रशांत पवार यांनी टि व्ही वर इतर कार्यक्रम पहाण्याबरोबर मन कि बात कार्यक्रम पहावा असे आवाहन केले. 

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *