वाशिम:-मंगरुळपीर येथील बहुचर्चीत असलेल्या सन २०१९ च्या अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतनिधीमध्ये झालेल्या अपहारात तत्कालीन तहसिलदारांसह इतर तलाठी व लिपीकांना दोषी ठरवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करत सेवेतुन निलंबित केले असले तरी अजुनही याप्रकरणातील दोषी महसुल कर्मचार्‍यांवर कारवाई न झाल्यामुळे ‘सेटलमेंट’ने हे प्रकरण गुंडाळले की काय असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पडला आहे.

सन २०१९ मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत अतिवृष्टी झाली होती.या अतिवृष्टीमध्ये शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते.या नुकसानीचा सर्व्हे शासकीय यंञणेणे करुन वरिष्ठांना पाठवला होता.शासनाकडुन या बाधित शेतकर्‍यांसाठी मदतनिधी ऊपलब्ध झाला होता.या निधीमध्ये फारमोठा अपहार करत भुमिहीन शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे पाठवून शासकीय यंञणांनी भ्रष्टाचार केला होता.याविषयी काहींनी प्रशासनाकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या.प्रथमतः काही तक्रारदारांचे खिसे गरम करुन प्रकरण आपसात घेतले परंतु हा प्रकार सर्वञ पसरल्यामुळे शासनाकडुन चौकशी लागली चौकशीत अनेक मुद्दे पुढे आले आणी दोषींवर कारवाई करणे सुरु झाले.तत्कालीन तहसिलदारांना या अपहारामध्ये दोषी धरत मुख्यालयी बदली करुन नंतर निलंबित केले.त्यानंतर तिन तलाठी व पुढे दोन लिपीकांनाही याचप्रकरणी निलंबित केले.परंतु महत्वाची बाब म्हणजे वरीष्ठ यंञणेला मलिदा न पुरवणार्‍या दोषी कर्मचार्‍यावर कारवाईचा बडगा ऊगारला तर टेबलाखालुन देणारांना माञ वाचवल्याची सर्वञ दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.ज्यांच्या नियंञणात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती त्या पथक प्रमुख आणी पथकातील सदस्यांना माञ सहजरित्या अभय दिल्याचे चिञ दिसते.ज्या सबंधित लिपिकाकडे सबंधित प्रभारच नव्हता त्यांचेवर ठपका ठेवून सेवेतुन निलंबित केले.परंतु निधी वाटपात प्रत्यक्ष सबंध असणार्‍या पथकाला देवून घेवून कारवाईपासुन दुर का ठेवले असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.लवकरच याप्रकरणी दोषींच्या नावासह वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे समजले.प्रधान सचिवाकडे यासंदर्भात चौकशीसाठी प्रकरण दाखल केले होते.परंतु अजुन घबाड बाहेर निघु नये म्हणून तक्रारकर्त्यालाच मॅनेज केल्याचा प्रकार झाल्याचे समजते.वरिष्ठांनी याप्रकरणी गंभीरतेने विचार करुन राहिलेल्या दोषी कर्मचार्‍यावरही कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *