भुयार चिंचोली येथे दिव्यांगांना सायकल वाटप; विकास कामांचे उद्घाटन
उस्मानाबाद : (सचिन बिद्री:उमरगा)
तालुक्यातील भुयार चिंचोली येथे सरपंच रणजीत गायकवाड यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचे उद्घाटन तथा दिव्यांग व्यक्तींना सायकलींचे वाटप , गावातील मुलींच्या लग्नासाठी व जन्मानंतर प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचा उपक्रमाची सुरवात उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांच्या हस्ते दि .१७ रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला .
ग्राम निधीतून मुलीच्या लग्नासाठी ५ हजार रू व मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम सरपंच रणजीत गायकवाड यांच्या पुढाकारातून सुरुवात करण्यात आला . गावातील काही निवडक कुटुंबांना मान्यवरांच्या हस्ते मुलींच्या लग्नासाठी पाच हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला . जिल्ह्यातील ही योजना राबवणारी ही पहिली ग्रामपंचायत असून भविष्यातील या योजनेअंतर्गत गावातील मुलींना या निधीचा लाभ होणार आहे .याबरोबरच ५ टक्के निधी मधून अपंगना १० सायकलींचे वाटप तर दलित वस्ती मधील २० लक्षरु च्या सिमेंट रोड चे उदाघाट्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पवार, युवक तालुका अध्यक्ष शमशुद्दीन जमादार, विष्णू भगत, कुमार थीटे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
या नवीन्यपूर्ण उपक्रमासाठी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले . या कार्यक्रमासाठी सरपंच रणजित गायकवाड, ग्रामसेवक श्रीमती. बी. व्ही. हंगरगेकर, तंटामुक्त अध्यक्ष ओम गायकवाड, ऍड. संजय पाटील, ऍड. अमर पवार,पोलीस पाटील पद्माकर पाटील,प्रमोद गायकवाड, पै.सचिन गायकवाड,नेताजी गायकवाड, कमलाकर तु. पाटील,अशोक दासमे,कमलाकर सुरेशचंद्र पाटील, लालडेसाब तांबोळी,सचिन पाटील,राहुल थोरात यांच्यासह गावातील ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.