2 आरोपी सह चोरीस गेलेल्या 4 मोटर सायकल जप्त
एकूण 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरात मागच्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असताना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वेगवेगळी पथके तयार करून तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट जवळील कमलेश टायरच्या बाजूस दोन इसम चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले होते. माहितीच्या आधारे त्या दोन्ही इसमांना त्यांच्याकडे दोन गाड्या ज्याचे कागदपत्रे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले त्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्या मोटरसायकली वेगवेगळ्या दोन ठिकाणाहून चोरी केल्याचे कबूल केले. करीम शेख आणि गणी शेख अशी दोन आरोपींची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर आणखी दोन मोटारसायकल ते राहात असलेल्या भाड्याच्या घरासमोर लावली असल्याचे सांगितले. तेव्हा त्या दोन आरोपी कडून चोरी केलेल्या एकूण 4 मोटारसायकली जप्त करून एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकातील पोलीस अंमलदार स.फौ. वहीद शेख, आर. बी. ढगे, पो.ना. महेश पारडे, तसेच गांधी चौक पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीशैल्य कोले, पोलीस हेडकॉन्स्टेबल दामोदर मुळे आणि पो.ना. पाटील यांनी पार पाडली.
मोमीन हारून, लातूर
9850347529