माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतरत्न राजीव गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
लातूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे व संगणक युगाचे प्रणेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त शनीवार २१ मे रोजी लातूर येथील राजीव गांधी चौकात उभा असलेल्या स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिन दाताळ, रमेश सूर्यवंशी, हरिराम कुलकर्णी, प्रवीण कांबळे, सिकंदर पटेल, अँड देविदास बोरुले, महापुरे , सौ मोरे, बिभीषण सांगवीकर, प्रवीण सावंत, नरेश पवार, कुणाल वांगज,यांच्यासह काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी,नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्यूज मराठी लातूर
9850347529