लग्नसराई च्या तारखा असल्याने २६ मे चा कार्यक्रम पुढील महिन्यात १० जून नंतर होईल

उस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव संयोजन समितीने दिली माहिती

लातूर : लातूर जिल्हा उस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जिल्ह्यातील मांजरा साखर परिवाराने उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न्याय देत विक्रमी गाळप करून मोठी मदत केली आहे त्याबद्दल उस उत्पादक शेतकरी मेळावा व मांजरा साखर परिवारातील माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांचा गौरव सोहळ्याचा कार्यक्रम २६ मे रोजी गुरुवारी लातूर येथे दगडोजीराव देशमुख सभागृह कृषि उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आला होता पण सध्या लग्नसराई च्या तारखेचे मुहूर्त या आठवड्यात जास्त असल्याने ग्रामीण भागांतील अनेक उस उत्पादक शेतकरी यांनी विनंती केल्याने २६ मे चा कार्यक्रम तूर्त पुढें ढकलण्यात येत असून साधारणतः जून च्या १० तारखेनंतर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे अशी माहिती उस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव संयोजन समितीचे सदस्य राजेंद्र मोरे, सत्तार भाई पटेल, अरुण कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

सध्या लग्नसराई मुळे या आठवड्यात मोठया प्रमाणावर विवाह सोहळे असल्याने अनेक शेतकरी बांधव यांनी संयोजन समितीकडे कार्यक्रम वेळ व तारीख पुढे ढकलावी अशी विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देवुन उस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव सोहळा १० जून नंतर घेण्यात येणार असून लवकरच या सोहळ्याची तारीख आपणास कळवण्यात येईल यासाठी सर्व उस उत्पादक शेतकरी यांनी सहकार्य करावे असे आवाहन उस उत्पादक शेतकरी मेळावा गौरव संयोजन समितीचे सदस्य राजेंद्र मोरे सत्तार पटेल अरुण कुलकर्णी नवनाथ शिंदे, राजीव कसबे, अशोक दहिफळे, काकासाहेब जाधव, हिराचंद जाधव, बंडू माळी, दगडु बरडे, अनंत पाटील, शाम जाधव यांनी केले आहे.

प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्यूज मराठी लातूर
9850347529

[3:56 PM, 5/21/2022] Latur Harun Momin: Portal news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *