लोकहितासाठी सदैव झटणार्या महल्ले यांना जनाधाराची साथ
आसेगाव सर्कलवर प्रतिभाताईलाच विजयी करू;जनतेचा कौल
वाशिम : [फुलचंद भगत ] : सदैव जनहीतासाठी झटणार्या समाजकारणासाठी राजकारण करणार्या गोरगरीबांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी आवाज ऊठवणार्या हक्काच्या नेत्या मा.पंचायत समिती सभापती प्रतिभाताई महल्ले यांना यावेळी आसेगाव सर्कलमधून भरगोस जनाधार देवून विजयी पताका फडकण्याचा चंग जनतेनी बांधला असुन लोकांच्या आग्रहाखातरच आपण अटकेपार झेंडा नेणार असल्याचे मत महल्ले यांनी व्यक्त केले आहे.

राजकारणाचा दांडगा अनूभव असणार्या आणी लोककेंद्री राजकिय जबाबदारी पार पाडणार्या माजी पंचायत समिती सभापती पदाची यशस्वी धुरा ज्यांनी सांभाळली अशा प्रतिभाताई महल्ले यांना जनतेनी अपक्ष असुनही पं.स.सदस्यतेला विजयी केले होते.आता नव्याने काही जागेवर जि.प.आणी पं.स.च्या निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्या प्रतिभाताईला जि.प.ची खुर्ची मोठा जनाधार देवून बहाल करायची असा चंग मतदारांनी बांधलेला दिसतोय.मतदारांच्या आग्रहाखातरच अतितटीची आणी प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या आसेगाव सर्कलमधुन जि.प.वर प्रतिभाताई महल्ले यांना निवडुन देवू आणी त्यांच्या पाठीशी राहु असा विश्वास मतदार दाखवत आहेत.लोकांचा जनाधार बघता तसेच याआधीची राजकीय यशस्वी कारकिर्द बघता वंचीतने आसेगाव सर्कलमधून ऊमेदवारी देवू असे आश्वासन महल्ले यांना दिले असल्याचे समजले परंतु ऐन वेळी दुसर्यालाच ऊमेदवारी देवून ताईंना ‘वंचित’ठेवण्याचे प्रयत्न काही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरुन झाल्याची चर्चा आहे.परंतु विरोधाची तमा न बाळगता राजकीय यशस्वी घोडदौड सुरुच ठेवुन ‘सेने’ च्या भरवश्यावर आसेगावचा राजकिय किल्ला सर करणार असल्याचा विश्वास प्रतिभाताई महल्ले यांनी बोलुन दाखवला आहे.जनतेनेही लोकहिताच्या कामालाच प्राधान्य देवून बळ द्यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.