अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण

वाशिम:- पोलीस दलातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पदोन्नतीस पात्र अंमलदारांच्या कुटुंबांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला कारणही तसेच आनंददायी आहे.पदोन्नतीस पात्र असलेल्या विजय अरखराव,आशिष खांडरे,राहुल व्यवहारे,अलका चाटे,मिलिंद नावकर,प्रदिप लांडगे,विलासकुमार सावजी,विजय सरनाईक,विजय तायडे,विजय जाढधव तसेच गजानन सैबेवार,कैलास गडदे,मोहन पाटील,अरविंद वंजारे,शेषराव शेजुळकर,राजेंद्र बगाले,प्रल्हाद चव्हाण,भिमराव भिसे,मारोती भवाळ असे एकूण १९ पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले.

या आदेशान्वये १० पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदारपदी तर ०९ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार पदावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.त्यानिमित्ताने दि.२१.०५.२०२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात सर्व पदोन्नती प्राप्त झालेल्या पोलीस अंमलदारांच्या पदोन्नती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पदोन्नत झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) गिफ्ट, पुष्पगुच्छ व डायरी देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी अंमलदारांनी ‘पदोन्नती मिळताच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.’ अश्याप्रकारच्या भावना व्यक्त केल्या. पदोन्नत सर्व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी अभिनंदन केले व पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.सदर सोहळ्यास पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे (IPS), पो.नि. श्री. सोमनाथ जाधव,स्थानिक गुन्हेशाखा,वाशीम,रा.पो.नि.श्री.मांगीलाल पवार, पोलीस मुख्यालय, वाशिम यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार ऊपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *