सचिन बिद्री: उस्मानाबाद:-
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होत आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांचन स्वामी यांची जय हनुमान शेतकरी विकास पॅनल मधून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली आहे.

खुदावाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक सध्या रंगात असून, दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.सौ. कांचन स्वामी यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे.सौ. कांचन स्वामी यांच्या बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, माजी राज्यमंत्री काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, जिल्हा परिषद माजी सभापती सदस्य ऍड. दीपक आलुरे तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण,अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे,जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, जय हनुमान शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख शरणाप्पा कबाडे आदी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.