कोण होणार विजेता याकडे जिल्ह्यांतील क्रिकेट प्रेमीचे लक्ष

मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश झोतात बुधवारी सायंकाळी भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा

क्रिडा संकुलात आयोजित स्पर्धेत प्रेक्षकांची गर्दी

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंती निमित्याने जिल्ह्यात युवकांचे नेते आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गेली दहा दिवसांपासून सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील ४०० संघांनी सहभाग नोंदवला होता. तालुक्यातील प्रथम स्थानी आलेल्या संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेत मुकाबला करावा लागला या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे बुधवारी क्रीडा संकुल येथे होणार असून या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला १ लाख रुपये, उपविजेेपद संघाला ५१ हजार व तृतीय स्थानी येणाऱ्या संघाला ३१ हजार रुपये रोख दिले जाणार आहे. बक्षीस वितरण सोहळ्यात बुधवारी सायंकाळीं जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांची उपस्थिती राहणार आहे. या शानदार सोहळ्यास क्रिकेट रसिक, लातूरकर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध क्रिकेट टीम नी उपस्थित राहावे असे आवाहन विलासराव देशमुख चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात रेणापूर संघाचा शानदार विजय

जिल्हा क्रिडा संकुल येथे सुरु असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियन क्रिकेट जिल्हास्तरीय सामन्यात मंगळवारी सायंकाळी रेणापूर संघाने देवणी संघाचा पराभव करून रोमहर्षक विजय प्राप्त केला आहे. आजच्या सामन्यात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष पत्रकार हरिराम कुलकर्णी यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, ट्वेण्टी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, ओबीसी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदार, शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, युवक काँग्रेसचे अहमदपूर चे अध्यक्ष देशमुख, मीडिया सेल चे उपाध्यक्ष विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

रेणापूर संघाने केला देवणीचा पराभव

आजच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात देवणी संघाने प्रथम फलंदाजी करत ७ षटकात रेणापूर समोर ६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते मात्र रेणापूर संघाचे ६१ धावांचे आव्हान ५ षटकात पाच गडी राखून शानदार विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *