वाशिम : कारंजा तालुक्यातील मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे यांनी मुलांकडुन धोंडी मागुन घेवुन वरुणराजाला साकडे घातले.हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून,त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला गावभर फिरविणे आणि अस्तित्वात नसलेल्या भ्रामक कपोल कल्पित गोष्टीचा प्रसार करीत पाण्यासाठी धोंडी मागण्याचे आणि असे गावात फिरल्याने पाणी येते अशी अविवेकी अंधश्रद्धा आणि तस्संम बाबीला खतपाणी घालणारी नुकतीच घटना कारंजा तालुक्यातील ग्राम मसला येथे घडली असून सदर घटणे बाबत विविध स्तरावर त्याच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या,सबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन निलंबित करा अशी मागणीही करण्यात आली असल्याने जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी गांभीरतेने या प्रश्नावर लक्ष देत संबधित बनारसे नामक शिक्षकास आपणास निलंबित का करू नये या बाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

धोंडी मागुन अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा ऊपक्रम विद्यार्थ्यांना सोबत घेवुन बनारसे नावाच्या जि.प.शिक्षकाने केला. सदर ऊपक्रमाची एका वृत्तपञातुन दि.३ जुनला प्रसिध्दीही देण्यात आली आहे. सदर ऊपक्रमातुन अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याने शिक्षकाच्या सेवाशर्ती नियमांचे भंग आहे.विद्यार्थ्यांना विज्ञानवाद शिकवायचे सोडुन अंधश्रध्दा जोपासणार्या असे कृत्य करवुन घेतल्यामुळे सर्व स्तरातुन रोष व्यक्त करण्यात येत असुन सदर शिक्षकाने कर्तव्यात नेमुन दिलेल्या कर्तव्याचा भंग केल्यामुळे त्वरीत निलंबित करावे अशा विविध सामाजिक संघटना,अंनिस,आणी इतर शिक्षकामधूनही प्रतिक्रीया सोशल मिडीयावर ऊमटल्या आहेत.सदर ऊपक्रमातुन मुलांना बालपणापासुनच अंधश्रध्देच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असुन सबंधितावर अंधश्रध्दा निमुर्लन कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशीही मागणी जोर धरत आहे.धोंडी प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकिय स्तरातुन त्वरीत दखल घेवून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशावरुन कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.याप्रकरणी पुढे शिक्षण विभाग काय कारवाई करते?की सबंधिताकडुन घेवुनदेवून प्रकरण सेटलमेंट होते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.याप्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास कायदेशीर रित्या काही संघटना आंदोलन करणार असल्याचे समजते.सदर शिक्षकासह स्थानिक मदत करणारे सहायक शिक्षक व वरिष्ठावरही कारवाईसाठी पाऊले ऊचलण्यात येणार असल्याचे कळले आहे.सबंधित शाळेवरील जे शिक्षक या धोंडी प्रकरणात सहभागी किंवा ऊपस्थीत नव्हते त्यांनाही कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडुन पाठवली असल्याने ज्यांनी धोंडी ऊपक्रमात सहभाग नोंदवला अशा जबाबदार शिक्षक आणी त्यांना पाठीशी घालणार्या यंञणेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.बःर्याच शिक्षक संघटना आणी इतर शिक्षकांनीही या धोंडी प्रकरणाचा निषेध केला असुन दोषींवर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी याप्रकरणी कोणती भुमिका घेतात याकडे शिक्षणविभाग आणी शिक्षणप्रेमीसह अंनिस आणी जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.
अन्यथा तिव्र आंदोलन
लहानपणी डोक्यात अंधश्रद्धा घातल्याने त्याचे अनेक वाईट परिणाम होतात विध्यार्थी हा निरपेक्ष असला पाहिजे त्याचाडोक्यात देशप्रेम ,राष्ट्र प्रेम,माणुसकी, आदर विज्ञानवाद, निर्माण करून एक आदर्श निर्माण करण्याचं कार्य प्राथमिक शिक्षक कडून होणे गरजेचे आहे मात्र आज काल शाळे तून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे ही बाब निंदनिय असून त्यातून शाळेतून आदर्श निर्माण करण्यासाठी अनेक शिक्षक कसोटीचे प्रयत्न करीत असताना दिसतात मात्र अश्या अंध श्रद्धा असलेल्या शिक्षका मुळे त्यांनाही अशा प्रकारचा त्रास होतो आहे .त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लघन झाले असून सदर शिक्षकावर कार्यवाही व्हावी,त्याला धडा बसावा अन्यस्था आम्ही आंदोलन करू अशी सामाजीक संघटनेकडुन आक्रमक भुमिका घेण्यात येत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206