आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी

गडचिरोली : अहेरी तालुक्यात ग्राम पंचायत राजपूर प्याच हद्दीत ओड्डीगुडम या गावाची पुनर्वसन साठी शासनाने जमीन देण्यात यावा ,ओड्डीगुडम हे गाव प्राणहीत नदीच्या किनारी वसलेला आहे, दर वर्षी पावसाळा आला कि महापूर येण्याची नाकारता येत नाही, म्हणून ओड्डीगुडम गावातील सर्व जनतेने ओड्डीगुडम गावासाठी शासनाकडून जमीन देऊन पुनर्वसन करावे असे निवेदन देण्यात आले
यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देण्यात आले सर्व गावातील स्थानिक लोक उपस्थित होते, निवेदन देतांना श्री महेश बाकीवार श्री रामाजी बद्दीवार ,अशोक वासेकर,शंकर टेकुलवार,लिगांजी जिल्लेडवार,शंकर पानेमवार,लक्ष्मण पानेमवार,हंनमतु टेकुलवार,व सर्व ओड्डीगुडम येतील गावकरी उपस्थित होते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी निवेदन स्वीकारताना पूर्णपणे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.