अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खरडुन गेलेल्या व नुकसान झालेल्यि पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी…

उस्मानाबाद : मागील आठवडाभरापासून बंदी भागातील कितीतरी गावतांड्याचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे आणि डोंगर माथ्यावरून वाहणारे नाले,ओहोळ विशेष म्हणजे नदी दुथडी ओसडुन वाहत असल्याने पुलावरुन सुद्धा पाणी वाहते आहे परिणामी नदीकाठची शेती खरडुन गेली सावकारी काढुन केलेली पेरणी काही ठिकाणी यशस्वी झाली ती खरडुन गेली तर काही ठिकाणी पेरणी उगवलीच नाही. खरबी,गाडी,बोरी,थेरडी,सोनदाभी,दराटी,कोरटा,बंदी टाकळी,सेवालालनगर,वालतुर,सोईट- घडोळी,भवानी,निंगणूर,बिटरगाव,मुरली,पिंपळगाव,मोरचंडी,एकंबा,सोनदाभी,जेवली,जवराळा,बिटरगाव,भोजनगर,रतननाईकनगर,बोरगाव,डोंगरगाव,घमापुर,चिखली,पळशी,नागापुर,खरुस बु,देवसरी,लोहरा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पर्यायाने संपूर्ण उमरखेड तालुक्यामध्ये
संततधार पाऊस सुरू आहे, गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे उगवलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे,अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या
पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा चालू खरीप हंगामामध्ये उमरखेड च्या सर्वच महसूल मंडळात संततधार पाऊस सुरू आहे,पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते,काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती,मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती,परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी व तसेच यासंदर्भात राज्यसरकारकडे मी,
यवतमाळचे दयावान लोकनेते,माजी मंत्री मा.श्री.मनोहरभाऊ नाईक साहेब व लोकप्रिय युवा नेते मा.आमदार इंद्रनिलभाऊ नाईक साहेब व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.बाळासाहेब कामारकर पाटील
यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून
अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार आहे.🙏🏻🙏🏻

•|| सदैव आपल्यासोबत ||•
बबलु जाधव पाटील
तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड

*संततधार पाऊस पडत असल्याने उमरखेड तालुक्यातील असंख्य शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान, परत माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या पदरी निराशा.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *