(सचिन बिद्री:उमरगा)
उमरगा मराठा सेवा संघाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ यांनी उमरगा तहसीलदार यांना दि १२ रोजी निवेदन देत,गो संवर्धन करण्याबाबत विनंती केली असून, उमरगा शहरात गोवंश हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदविन्यात आला आहे.
दि १० जुलै,सोमवार रोजी ‘आषाढी एकादशी’ चा पवित्र दिवस होता याच दिवशी उमरगा शहरातील कोळीवाडा भागात काही इसमांनी ‘बकरी ईद’ च्या निमित्ताने कुर्बाणीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा दैवत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ‘खिल्लार’ जातीच्या बैलाची निर्घृण पणे कत्तल केली होती,त्याबाबत संबंधित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत सविस्तर वृत्त एन टी व्ही न्युज मराठी वृत्तवाहिणी आणि दै गुरुधर्म ने बातमी प्रकाशित केली होती. सदर बातम्या जिल्हाभरातील पशुप्रेमी व हिंदू संघटनांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत घडलेल्या घटनेचा निषेध दर्शविला आहे.तर उमरगा मराठा सेवा संघाचे सचिव भूमिपुत्र वाघ यांनी उमरगा तहसीलदार यांना निवेदन सादर केला आहे.निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात व जिल्ह्यात गो संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.बऱ्याच ठिकाणी गोवंश कापला जात आहे. तो कापला जाऊ नये यासाठी पोलीस(संबंधित विभाग) यंत्रणा सतर्क राहावी,शासकीय कर्मचारी यांना सतर्क राहणे बाबत आपण कार्यवाही करून भविष्यात गोधनाचा वंश संपू नये यासाठी सरकारी पातळीवरती योग्य ते निर्णय घ्यावेत आणि गोधन संरक्षणासाठी आपल्याकडून सहकार्य मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे.सोमवारी आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी उमरगा शहरात बकरी ईद निमित्ताने खिल्लार जातीच्या बैलाची कत्तल झालेल्या घटनेचा निषेधही नोंदविण्यात आला आहे.